मुंबई : अंधेरी पोलिसांनी हरियाणातून दोन आरोपींना सुमारे दोन लाख रुपयांच्या वीजबिलाच्या फसवणुकीप्रकरणी अटक केली आहे. हा प्रकार साधारणत: फेब्रुवारी महिन्यातील आहे. यावेळी तक्रारदाराला त्याच्या फोनवर संपर्क साधण्यात आला होता आणि बिल न भरल्यास त्याच्या घराचे वीज कनेक्शन तोडले जाईल असे सांगण्यात आले होते.
अंधेरी सायबर पोलिसांनी फसवणूक करणार्यांचे बॅंकखाते तपशील, युपीआय, IMPS लॉग व्यवहार आणि मोबाइल नंबर या तपासापासून शोध घेण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे ते हरियाणातील हिसार जिल्ह्यातील फाटक आणि सादलपूर गावापर्यंत पोहोचले. आणि तेथून सायबर केस अंतर्गत आरोपींना अटक केले.
अंधेरी पोलिसांच्या एका पथकाने हरियाणात जाऊन फाटक येथील नवीन बिश्नोई (वय २३) आणि राकेश बिश्नोई (वय २१) यांना अटक केली आहे. नवीन बिश्नोई मोबाईल तंत्रज्ञ आहे. तर राकेश बिश्नोई हा सादलपूर येथील शेतकरी आहे. पोलिसांनी या दोघांकडून एक आयफोन आणि एक अँड्रॉइड मोबाईल जप्त केला आहे.