शेअर मार्केट अपडेट्स: शेअर बाजारात लक्षणीय पडझड

23 Oct 2023 17:00:57

Stock
 
 
शेअर मार्केट अपडेट्स: शेअर बाजारात लक्षणीय पडझड
 

मुंबई: घरगुती निर्देशांक शेवटच्या ट्रेडिंग सत्रात कोसळले आहेत. निफ्टी ५० इंडेक्स मध्ये तब्बल ८२.५ पूर्णांकाने कमी होत १९५४२ पर्यंत खाली आला आहे. दुसरीकडे सेन्सेक्स इंडेक्स २३१.६२ पूर्णांकांने खाली येऊन ६५३९७.६२ पर्यंत आला आहे.
 
बँक इंडेक्स ३१.४५ पूर्णांकांने घसरत ४३७२३ अंकांपर्यंत खाली आला आहे. एकीकडे आज सोन्याच्या व चांदीच्या दरात घसरण झाली असली तरी देखील मिडकॅप शेअर्सला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. गेले काही दिवस तेलाच्या किंमती व मध्यपूर्वेतील युद्धाचा दबाव प्रभाव पडत आजही मार्केट Volatile (अस्थिर) राहिले आहे.
 
आयटी,पीएसयु,मेटल,मिडिया या सगळ्या क्षेत्रात लाल कंदिलच दिसला.एनएसी मध्ये कोटक महिंद्रा, इंडसइंड बँक,एसबीआय लाईफ इन्शुरन्स, टीसीएस,एनटीपीसी हे शेअर्स तेजीत ठरले असून दुसरीकडे आयटीसी,टाटा स्टील,बीपीसील,सिप्ला अशा शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. मिडकॅप इंडेक्सची दोन महिन्यांतील सर्वात कमी अंकाची नोंद करण्यात आली.
 
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) शुक्रवारी ४५६.२१ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली.
 
Powered By Sangraha 9.0