"राम आणि श्रीकृष्णाला जेलमध्ये पाठवले असते"; राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या प्राध्यापकाचे वादग्रस्त वक्तव्य

23 Oct 2023 15:30:26
 Allahabad University
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील अलाहाबाद विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने भगवान राम आणि कृष्ण यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. विक्रम हरिजन असे आरोपीचे नाव असून तो आधुनिक इतिहास विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. विक्रमने त्याच्या एक्स खात्यावर राम आणि कृष्णाला तुरुंगात पाठवण्याबाबत बोलले आहे. या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेने रविवारी (२२ ऑक्टोबर २०२३) प्राध्यापक विक्रम यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 
हे प्रकरण कर्नलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. विश्व हिंदू परिषद प्रयागराजचे अधिकारी शुभम यांनी आरोपी प्राध्यापकाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शुभमने तक्रारीत म्हटले आहे की, असिस्टंट प्रोफेसर विक्रम हरिजन हा दररोज त्याच्या एक्स हँडलवरुन हिंदू देवी-देवतांचा अपमान करायचा. शुभम यांनी म्हटले आहे की, प्राध्यापकाने भगवान राम आणि कृष्णाविरोधात लिहिलेल्या शब्दांमुळे सामान्य जनताच नाही तर अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थीही संतापले आहेत.
 
आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाविरुद्ध आयपीसीच्या कलम १५३ अ, २९५ अ आणि आयटी कायद्याच्या कलम ६६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “आज जर भगवान श्री राम असते तर मी त्यांना ऋषी शंभूक यांच्या हत्येप्रकरणी आयपीसीच्या कलम ३०२ अंतर्गत तुरुंगात पाठवले असते आणि आज कृष्ण असते तर मी त्यांना लैंगिक छळाच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले असते."
 
 
Powered By Sangraha 9.0