२४ ऑक्टोबरपासून पियुष गोयल सौदी अरेबिया दौऱ्यावर

23 Oct 2023 15:23:04
Piyush G
 
२४ ऑक्टोबरपासून पियुष गोयल सौदी अरेबिया दौऱ्यावर
 
मुंबई: व्यापार सक्षमीकरणासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल २४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात रियाध मध्ये वरिष्ठ नेते आणि व्यावसायिकांची भेट घेणार आहेत. गोयल सौदी अरेबियातील रियाध येथे फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्हच्या (एफआयआय) सातव्या आवृत्तीत सहभागी होणार आहेत.
 
ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुल अजीज बिन सलमान अल-सौद यांच्यासह सौदी अरेबियाच्या (केएसए) मान्यवरांची ते भेट घेणार आहेत. वाणिज्य मंत्री माजिद बिन अब्दुल्ला ह अल कसाबी; गुंतवणूक मंत्री, खालिद ए. अल फालिह; उद्योग आणि खनिज संसाधन मंत्री बंदर बिन इब्राहिम अलखोरायेफ तसेच गव्हर्नर पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड (पीआयएफ) यासिर रुम्मायन आदींचा समावेश आहे.
 
पियुष गोयल सौदी अरेबियाच्या गुंतवणूक मंत्र्यांसमवेत 'जोखमीपासून संधीकडे: नव्या औद्योगिक धोरण युगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी धोरणे'  या विषयावरील कॉन्क्लेव्ह सत्राचे सहअध्यक्षपद भूषवतील. ते जगभरातील उद्योगपती आणि आघाडीच्या सीईओंना भेटण्याची शक्यता आहे.
 
एफआयआय इन्स्टिट्यूट ही एक जागतिक नॉन-प्रॉफिट फाऊंडेशन आहे ज्याचा उद्देश गुंतवणुकीच्या नवीन मार्गांवर चर्चा करण्यासाठी जगभरातील सरकार आणि व्यावसायिक नेत्यांना एकत्र करणे आहे.
 
Powered By Sangraha 9.0