वाघ बकरीचे प्रतिथयश उद्योजक पराग देसाई यांचे दुर्दैवी निधन

    23-Oct-2023
Total Views |
parag desai
 
 
वाघ बकरीचे प्रतिथयश उद्योजक पराग देसाई यांचे दुर्दैवी निधन
 
अहमदाबाद: गुजरात टी प्रोसेसर व पॅकर्स (वाघ बकरी) चे संचालक उद्योजक पराग देसाई यांचे २२ ऑक्टोबरला निधन झाले आहे. आठवडाभरापूर्वी घराबाहेर एका विचित्र अपघातात देसाई गंभीर जखमी झाले होते. त्यांचे वयाच्या ४० व्या खाजगी इस्पितळात निधन झाले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार ते पंधरा तारखेला अहमदाबाद येथील इस्कॉन अंबली रोड येथे सकाळी प्रभातफेरीसाठी निघाले असता गंभीर जखमी झाले आहे. याशिवाय भटक्या कुत्र्यांपासून स्वतःच संरक्षण करताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
 
पराग देसाई यांनी वाघ बखरी चहाच्या ब्रँडला देशातील आघाडीचा ब्रँड बनवला होता. न्यूयॉर्क येथील लाग आईसलॅंड विद्यापीठातून त्यांनी एमबीए पूर्ण केले होते. शुन्यातून वाघ बकरी ब्रँडला मोठे करण्यात देसाई यांचा वाटा समजला जातो. मार्केटिंग, सप्लाय चेन, क्वालिटी, क्वांटिटी या सगळ्या आघाड्यांवर त्यांना यश मिळाले होते. १०० कोटींहून कमी मुल्यांकन असलेल्या वाघ बकरी चहाचे नेतृत्व देसाई यांनी १९९५ मध्ये सुरू केले होते. आज वाघ बकरी चहाचे मार्केट व्हॅल्युशन २००० कोटींहून अधिक आहे. भारतातील अनेक राज्यांत किंबहुना परदेशात देखील या चहाची निर्यात केली जाते.
 
सगळ्या व्यवसायिक बाजारपेठत वाघ बकरी चहा पोहोचविण्यात देसाई यशस्वी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.