पतीसमोरच ५ जणांनी केला महिलेचा सामूहिक बलात्कार!

23 Oct 2023 17:41:11
Odisha women rape

भुवनेश्वर :
ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. येथे महाविद्यालयात शिकणाऱ्या विवाहितेवर तिच्या पतीसमोरच ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलगी कॉलेजला सुट्टी संपवून पतीसोबत घरी जात होती. तसेच आरोपींनी पीडितेला मारहाण करून लुटले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण ओरिसाच्या ढेंकनाल जिल्ह्यातील आहे. येथील बरुआ भुवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाविद्यालयात शिकणारी विवाहित महिला कालियापानी येथील आपल्या घरी वापस जात होती. महिलेचा नवरा तिच्यासोबत होता. सायंकाळी दुचाकीस्वार दाम्पत्य काजूच्या जंगलाजवळ पोहोचले असता तेथे उपस्थित असलेल्या ५ जणांनी त्यांना अडवले. महिला आणि तिच्या पतीला जंगलात ओढले गेले. येथे सर्वांनी आलटून पालटून पीडितेवर तिच्या पतीसमोर बलात्कार केला.

यादरम्यान तिच्या पतीने पीडितेला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी विरोध केला असता पाच आरोपींनी महिला आणि तिच्या पतीलाही मारहाण केली. तेथून निघताना आरोपींनी महिला आणि तिच्या पतीची पर्स आणि मोबाईल फोनही लुटला. दोन्ही पीडित कसे तरी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी भुवन पोलीस ठाणे गाठले. येथे महिलेने तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत एफआयआर दाखल केला. पोलिसांनी पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

कलिंग न्यूजनुसार, पीडितांकडे रोख नसताना आरोपींनी यूपीआय द्वारे खात्यात पैसे ट्रान्सफर केले. पोलिसांनी पथके तयार करून अज्ञात आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध सुरू केला. अद्याप कोणाच्या अटकेची माहिती समोर आलेली नाही.

Powered By Sangraha 9.0