मुंबई : भारतीय क्रिकेटविश्वातील दिग्गज फिरकीपटूंपैकी एक असलेले माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचे निधन झाले. बेदी यांनी प्रदीर्घ आजाराने वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बिशनसिंग बेदी हे डावखुरा फिरकीपटू म्हणून विशेष गाजली. त्यांनी २२ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्वही केले होते. बेदी हे १९६७ ते १९७९ या काळात भारताचे प्रतिनिधीत्व केले.
दरम्यान, बिशन सिंग बेदी यांनी भारतासाठी ६७ कसोटी सामन्यांमध्ये २६६ बळी घेतले. तसेच, त्यांनी १० एकदिवसीय सामने खेळले. यात त्यांनी ७ विकेट्स घेतल्या. दरम्यान, भारतातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंपैकी एक म्हणून ओळखले जाणारे बेदी हे भारताच्या फिरकी गोलंदाजीच्या क्रांतीचे शिल्पकार होते. त्याने, इरापल्ली प्रसन्ना, बीएस चंद्रशेखर आणि एस. वेंकटराघवन यांच्यासमवेत भारताच्या पहिल्या-वहिल्या एकदिवसीय विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. बेदीच्या १२-८-६-१ च्या आकडेवारीने १९७५ च्या विश्वचषकात पूर्व आफ्रिकेला १२० धावांवर रोखले.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये, बेदी यांनी प्रामुख्याने दिल्ली संघाचे प्रतिनिधीत्व केले. तर निवृत्तीनंतर त्यांनी अनेक नवोदित भारतीय क्रिकेटपटूंसाठी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून काम केले. क्रिकेटच्या क्षेत्रापासून दूर, त्याने जेंटलमन्स गेममध्ये समालोचक म्हणूनही काम केले.