हमास इस्त्रायलवर करणार होता २६/११ सारखा हल्ला! इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागले पुरावे

23 Oct 2023 16:24:40

Hamas


मुंबई :
इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध अद्याप सुरुच आहे. दरम्यान, आता एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ७ ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी हमासचे दहशतवादी सायनाइड असलेली रासायनिक शस्त्रे वापरणार असल्याची माहिती मिळाली आहे.
 
इस्रायलमधील किबुत्झमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून काही यूएसबी पेन ड्राइव्ह इस्रायली गुप्तचर यंत्रणांनी जप्त केले आहेत. या पेन ड्राईव्हमध्ये दहशतवादी संघटना अल कायदासारखी सायनाइड असलेली रासायनिक शस्त्रे बनवण्याची पद्धत सांगण्यात आली आहे.
 
यामध्ये सायनाइड असलेले रासायनिक बॉम्ब कसे बनवायचे आणि त्याचा वापर करुन जास्तीत जास्त विनाश कसा करायचा हे विस्तृतपणे सांगितले गेले आहे. दरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांकडून मिळालेली ही माहिती २००३ मध्ये अल कायदा या दहशतवादी संघटनेने तयार केली असल्याची माहिती इस्रायलच्या सुरक्षा दलांना मिळाली आहे.
 
यावर इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हरझोग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “ही अल कायदाची सामग्री आहे. आम्ही अल कायदा, इसिस आणि हमासचा मुकाबला करत आहोत," असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या इस्त्रायल आणि हमासमधील युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेला आहे.

Powered By Sangraha 9.0