"भारतात लाज वाटत असेल तर पाकिस्तानमध्ये ये"; पत्रकार 'अरफा खानम'ला दानिश कनेरियाचा सल्ला
23-Oct-2023
Total Views |
मुंबई : पत्रकार अरफा खानम शेरवानी या अनेकदा कट्टरवाद्यांचा अजेंडा पुढे नेण्यासाठी ओळखल्या जातात. पण आरफा खानम यांना पाकिस्तानी खेळाडू दानिश कनेरियाने असे धारेवर धरले की, त्यांची चांगलीच फजिती झाली. अरफा खानम शेरवानी भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत भारतीय प्रेक्षकांच्या विरोधात नकारात्मक वातावरण पसरवत होत्या.
त्याने ट्विटमध्ये लिहिले की, “एक भारतीय म्हणून मला विश्वचषकाच्या सामन्यांदरम्यान अनेक चाहत्यांच्या निंदनीय वागणुकीमुळे लाज वाटते. या खेळाचा उद्देश लोकांना एकत्र आणणे हा होता, पण घाणेरड्या, असुरक्षित भावना आणि बहुसंख्यतावाद हे मोदी-आरएसएसने गेल्या १० वर्षात निर्माण केलेल्या वातावरणाचे प्रतीक आहे."
मात्र, पाकिस्तानी यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने मैदानावरच नमाज अदा करण्याबाबत अरफा खानम शेरवानी मौन बाळगून आहेत. यावेळी पाकिस्तानचा हिंदू क्रिकेटर दानिश कनेरिया याने त्यांना प्रत्युत्तर देत म्हटले की, “जर तुम्हाला भारतीय म्हणून लाज वाटत असेल तर माझ्या देशात या पाकिस्तानात. भारताला तुमच्यासारख्या लोकांची गरज नाही. मला खात्री आहे की तुम्हाला पाकिस्तानात पाठवण्याचा खर्च भारतीय करतील.”
यानंतर आरफा खानम शेरवानी यांनी दानिशच्या विरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली. त्या म्हणाल्या की, "दानिश कनेरियाने माझ्या 'ऑनलाइन लिंचिंग'साठी एक जमाव सोडली आहे माझे नाव ट्विटरवर ट्रेंड करत आहे. अनेक धर्मांच्या चाहत्यांचे लाडके असलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आता जातीयवादी ट्रोल झाला आहे याचे मला दुःख आहे."
यानंतर दानिश कनेरियाने अरफा खानम शेरवानी (मॉब, लिंच, धार्मिक, ट्रोल) वापरलेल्या शब्दांवर ताशेरे ओढले. हे अपप्रचार करणारे शब्द आपल्या विरोधात वापरू नयेत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. दानिश कनेरिया यांनी विचारले की, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये कुठेही जातीयवादाबद्दल बोलले आहे का? दानिश कनेरियाच्या या ट्विटनंतर आरफा खानम शेरवानी यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.