विवेक अग्निहोत्रींचा आगामी चित्रपट ‘महाभारता’वर !

    21-Oct-2023
Total Views |

vivek 
 
मुंबई : ‘द कश्मिर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटांतुन समाजातील दाहक वास्तव जगासमोर मांडणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता आणखी एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. नुकताच त्यांना ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर लागलीच त्यांनी त्यांच्या ‘महाभारता’वर आधारित आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.
 

mahabharat 
 
 
प्रसिद्ध कन्नड लेखक साहित्य अकादमी विजेते साहित्यकार एस एल भैरप्पा यांच्या ‘पर्व’ नावाच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. ‘पर्व’ ही कादंबरी महाभारत आणि महाभारतातील व्यक्तिरेखेवर आधारित असल्यामुळे विवेक अग्निहोत्री यांनी महाभारतावर चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर महाभारतावर आधारित अनेक चित्रपट अथवा मालिका आल्या होत्या, मात्र, विवेक अग्निहोत्री यांच्या वेगळ्या दिग्दर्शनाच्या शैलीतुन हा महाभारतावरील चित्रपट कसा असेल हे पाहणे महत्वाचे असणार आहे.