मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यात येतो. मात्र, दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली आणि दोन्ही गटाचे वेगवेगळे मेळावे होऊ लागले. यंदा शिवाजी पार्कवर उबाठा गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. यापूर्वी उबाठा गटाच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कात भाजपकडुन जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने शिवाजी पार्कात शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत. अमित शहा यांचा २२ ऑक्टो. रोजी वाढदिवस असतो. बॅनरवर भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे फोटो दिसत आहेत. 'बुराई पर अच्छाई की जीत' असा उल्लेख होर्डिंग्ज वर करण्यात आला आहे.