मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर त्यांनी ही भेट घेतली आहे. संजय पांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय पांडे हे मुंबईचे पोलिस आयुक्त होते. तसेच ते उद्धव ठाकरेंचे ते निकटवर्तीय असल्याचेही बोलले जाते. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याचा आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती.
त्यानंतर त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला होता. आता त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. ही भेट कशासाठी होती याबाबत अजून स्पष्टता नाही. मात्र, संजय पांडे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.