रवींद्र वायकरांना पंचतारांकित हॉटेल प्रकरणी पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश!

    20-Oct-2023
Total Views |
Ravindra Waikar News

मुंबई
: जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधलेत. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. त्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावलं आहे. त्यांना दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेत.

मात्र या प्रकरणावर मला कोणतीही नोटीस आलेली नाही, असे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत रवींद्र वायकर यांनी सांगितले. पंरतु जर नोटीस आली तर चौकशीला देखील हजर राहण्याची तयारी असल्याचं वायकरांनी यावेळी सांगितले.