कुत्र्याचं नाव 'नूरी' ठेवणं राहुल गांधींच्या अंगाशी!
AIMIM च्या नेत्यानकडून याचिका दाखल
20-Oct-2023
Total Views |
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे 'नूरी' प्रकरण त्यांना चांगलेच महागात पडले आहे. जागतिक प्राणी दिनाच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी आपल्या आईला एक कुत्र्याचे पिल्लू भेट दिले होते. त्यांनी या पिल्ल्याचे नाव 'नूरी' असे ठेवले होते. परंतू, यावर असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाच्या नेत्याने आक्षेप घेतला आहे.
एआयएमआयएमचे नेते मोहम्मद फरहान यांनी राहूल गांधींवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला असून हे प्रकरण आता कोर्टात गेले आहे. नूरी हा शब्द इस्लामशी संबंधित असल्याचे एआयएमआयएमचे नेते मोहम्मद फरहान यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.
तसेच इस्लाम धर्मात मुहम्मद पैगंबर यांच्याशीही तो शब्द संबंधित आहे. यासोबतच कुराणात नूरी शब्दाचा उल्लेख असून अनेक मुस्लिम मुलींचे नावही नूरी असल्याने मुस्लीम मुली, वृद्ध आणि आमच्या मोहम्मद पैगंबर यांचा अपमान झाला आहे, असेही ते म्हणाले आहेत.
त्यामुळे राहूल गांधी यांनी याबद्दल माफी मागावी आणि कुत्र्याच्या पिल्ल्याचे नाव बदलावे, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच राहूल गांधी यांच्याविरुद्ध कलम २९५A अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आल्याचे मोहम्मद फरहान यांच्या वकिलाने सांगितले आहे.