ललित पाटील अद्यापही उबाठासेनेतच! राऊतांची पोलखोल

20 Oct 2023 12:02:30
 
Lalit Patil
 
 
मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटिल हा अजूनही उबाठासेनेतच असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडुन करण्यात येत आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटिल प्रकरणी विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी खासदार संजय राऊत आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ललित पाटीलने अद्यापही ठाकरे गटाला आपला राजीनामा दिलेला नाही. २०१६ मध्ये ललित पाटिल याने शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता.
 
निलम गोऱ्हे म्हणाल्या, "२०१६ साली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ललित पाटील याने पक्षात प्रवेश केला. आपल्या पक्षात कशी माणसं येतात, ते काय करतात ही जबाबदारी जशी उद्धव ठाकरेंची होती तशीच ही जबाबदारी संपर्क प्रमुख संजय राऊत यांची देखील होती. २०१६ मध्ये तो पक्षात आला होता, त्यानंतर तो पक्षाच्या बाहेर कधी गेला? दुसऱ्या पक्षात तो काम करायला लागला का? त्याने अजूनही पक्ष सोडला नाही किंवा राजीनामा देखील दिला नाही, हे राजकारण योग्य नाही." असे सवाल निलम गोऱ्हे यांनी ठाकरेंना उपस्थित केले.
 
एवढा बेकायदेशीर ड्रग्स कारखाना सुरू असतांना अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष कसं होऊ शकतं? या प्रकरणात औषध मंत्र्यांनी दखल घ्यावी. या तपासामध्ये आरोग्य आणि वैद्यकीय अभ्यास असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यंचा समावेश करण्यात यावा. असे आदेश निलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.
 
या प्रकरणावर ट्विट करत भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले, "ललित पाटील अजूनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत, सर्वज्ञानी संजय राऊत यांनी दिशाभूल करू नये”... नीलम ताई गोऱ्हे. बंगल्यावर खोके पोचवत होता तोपर्यंत ललित आमचा लाडका.. रंगेहात पकडला गेला की ललित तुमचा ओंडका... खोक्यांचे सोप्पीकरण." अशी टीका भातखळकरांनी केली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0