बांग्लादेशविरुध्दच्या सामन्यात पंचांनाही विराट कोहलीचे शतक पाहायचे होते

20 Oct 2023 15:52:35
ICC World Cup 2023 Ind vs Ban Match

मुंबई :
विश्वचषकातील भारताचा चौथा सामना बांग्लादेशविरुध्द पुण्यात खेळविण्यात आला होता. या सामन्यात भारताने बांग्लादेशचा ०७ विकेट्सने धुव्वा उडविला होता. या सामन्यावेळी विशेष लक्ष विराट कोहलीच्या कामगिरीवर राहिले. कोहलीने ९७ चेंडूत १०३ धावा करत आपल्या कारकिर्दीतले ४८ वे शतक साकारले.

दि. १९ ऑक्टोबर रोजी, पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामन्यादरम्यान, मैदानावरील पंच रिचर्ड केटलबरो यांच्या एका निर्णयामुळे प्रतिक्रिया उमटल्या. बांगलादेशचा डावखुरा फिरकीपटू नसुम अहमदने चेंडू टाकताना विराट कोहलीचे पॅड लेग साइडच्या खाली गेले तेव्हा ही घटना घडली. चेंडू वाइड असल्याचे दिसत असूनही अंपायरने वाइड कॉल दिला नाही.

कोण आहेत अंपायर रिचर्ड केटलबरो? 

क्रिकेटविश्वातले जगप्रसिध्द असे अंपायर म्हणून रिचर्ड केटलबरो यांची गणना केली जाते. अंपायर रिचर्ड केटलबरो हे इंग्लंडचे असून त्यांनी इंग्लंडसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी देशाचे प्रतिनिधीत्वदेखील केले आहे.  अंपायर रिचर्ड केटलबरो हे भारत आणि बांग्लादेश सामन्यावेळी अंपायरिंग करत होते. 

दरम्यान, याशिवाय त्यांनी ३३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १२५८ धावा आणि २१ लिस्ट ए सामन्यांमध्ये २९० धावा केल्या आहेत. तो डावखुरा टॉप ऑर्डर फलंदाज आणि अर्धवेळ गोलंदाज होता. २००६ मध्ये त्याला ECB च्या अंपायरिंग यादीत समाविष्ट करण्यात आले. २००९ मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील T20 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय अंपायरिंग पदार्पण केले.

दरम्यान, या सामन्यात भारताला विजयाला काही धावा शिल्लक असताना विराट कोहली शतकाच्या जवळ होता. ३ धावा आणि विराट शतकासाठी ३ धावांची गरज होती. या सामन्यातील पंच रिचर्ड केटलबरो यांनी नसुम अहमदच्या पहिल्या चेंडूवर वाइड कॉल दिला नाही. त्यामुळे विराट कोहलीला शतक साकारण्यासाठी एकप्रकारे संधीच मिळाली.

या संधीचा फायदा घेत कोहली नसुम अहमदच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार लगावला. आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतले ४८ वे शतक साकारले. दरम्यान, यावेळी पंचाच्या निर्णयाचे सर्वांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. भारतीय फँन्सदेखील, पंचाच्या निर्णयामुळे सुखावल्याचे पाहायला मिळाले.

Powered By Sangraha 9.0