डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांच्या तुफानी खेळीसमोर बाबरसेनेची धूळधाण!

20 Oct 2023 18:05:28
David Warner and Mitchell Marsh Crucial Partnership

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकातील सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३६७ धावांचा डोंगर उभा केला. यात डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी २५९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

डेव्हिड वॉर्नरने १४ चौकार आणि ९ षटकारांसह १२४ चेंडूत १६४ धावा करत संघासाठी योगदान दिले. तर मिचेल मार्शने १०८ चेंडूत १२१ धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने ५४ धावा देत महत्त्वपूर्ण ५ विकेट्स घेतल्या. तर हॅरिस रौफने ३ विकेट्स घेतल्या. यासह बाबरसेनेस हा सामना जिंकण्यासाठी ३६७ धावांची गरज आहे.
Powered By Sangraha 9.0