तेलाच्या वाढत्या किमती व मर्यादित झालेल्या उत्पादनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आव्हान - शक्तिकांता दास
मुंबई: सध्याच्या जागतिक अर्थव्यवस्थेतील तेलाच्या वाढत्या किमती व मर्यादित झालेल्या उत्पादनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर समोर एक आव्हान उभे राहिले असल्याचे प्रतिपादन दास यांनी केले आहे.आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी कौटिल्य इकोनोमिक कॉन्क्लेव्ह मध्ये बोलताना हा विधान केले.
'महागाई दराची पातळीत सातत्याने बदल होत असतानाच विकासदरात बदल ह़ोत आहेत.दुसरीकडे विकास थंडावला असण्याबरोबरच सध्याच्या जागतिक घडामोडी व घडणाऱ्या घटनांमुळे यांचा परिणाम वृद्धीसाठी होत आहे.'असे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी सांगितले.
इस्त्रायल गाझा वादात विशेषतः मध्यपूर्वेतील युद्धाची परिणीती तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे.यापुढेही १ टक्यांने किंमत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जागतिक परिस्थिती बघता भारताबद्दल बोलताना गर्व्हनर शक्तिकांता दास म्हणाले, 'आमची आर्थिक मुलभूत तत्त्वे स्थिर आहेत. अखेरीस, या अनिश्चित काळात, तुमची आर्थिक मूलभूत तत्त्वे किती मजबूत आहेत, तुमचे आर्थिक क्षेत्र किती मजबूत आहे हे महत्त्वाचे आहे.मला वाटते की या दोन्ही पॅरामीटर्सवर भारत योग्य आहे,”