मुंबई : अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या 'मिशन राणीगंज' या चित्रपटामुळ चांगलाच चर्चेत आहे. एका वर्षात अनेक चित्रपट करणारा कलाकार म्हणून अक्षयची जरी ओळख असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये त्याने बरेच फ्लॉप चित्रपट दिले. मात्र, कुठेही हार न मानता अक्षय पुन्हा एकदा देशावर आधारित चित्रपटांच्या मालिकांकडे वळलेला दिसून येत आहे. अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव 'स्काय फोर्स' आहे.
अक्षय कुमारचा स्काय फोर्स या चित्रपटात इंडियातील पहिल्या आणि प्राणघातक हवाई हल्ल्याची कथा दाखवण्यात येणार असून यात स्काय अक्षय एअर फोर्स ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट एक प्रकारचा एरियल अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे.
या चित्रपटात अक्षयसोबत सारा अली खान, निमृत कौर, वीर पहाडिया यांच्याही भूमिका असणार आहेत. स्काय फोर्स चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर आणि संदीप केवलानी यांनी केलं आहेत. दिनेश विजन, ज्योती देशमुख आणि अमर कौशिक हे त्याचे निर्माते आहेत.