इस्रोने दिली मोठी गुडन्यूज - आदित्य एल १ लॅग्रेंज पॉइंटकडे मार्गस्थ

02 Oct 2023 11:26:49

ADITYA L1

मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) भारताच्या सूर्य मोहिमेबाबत ३० सप्टेंबर रोजी  ट्वीट करत मोठी माहिती दिली आहे. भारताच्या आदित्य एल १ मोहिमे अतंर्गत पाठवण्यात आलेल्या अंतराळ यानाने पृथ्वीपासून ९.२ लाख किलोमीटरचे अंतर पार करून पृथ्वीच्या प्रभाव कक्षेतून यशस्वीरित्या बाहेर पडले आहे. ते आता लॅग्रेंज पॉइंट १ (L1) च्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.
 
इस्रोने आदित्य एल १ मोहिमेबाबत माहिती देताना सांगितले की, इस्रोने पृथ्वीच्या प्रभाव कक्षेच्या बाहेर यान पाठवण्याची ही दुसरी वेळ आहे. या पूर्वी मंगलयान (मार्स ऑर्बिटर) मिशन पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राबाहेर पहिल्यांदा पाठवण्यात इस्रोला यश आले होते.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल १ ही भारताची पहिली अंतराळ मोहीम आहे. २ सप्टेंबर, २०२३ रोजी श्रीहरिकोटा येथून आदित्य एल १चे प्रक्षेपण झाले होते. या उपग्रहाला पृथ्वीपासुन लॅग्रेंज पॉइंटपर्यंत पोहचण्याकरत ४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तरी पृथ्वीच्या प्रभाव कक्षेतून बाहेर पडून यानाचा लॅग्रेंज पॉइंटचा प्रवास सुरु झाला आहे.

September 30, 2023 ">
Powered By Sangraha 9.0