दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! पुणे इसिस प्रकरणात मोस्ट वाँटेड दहशतवादी 'शाहनवाज'ला अटक

02 Oct 2023 11:47:19

Shahnawaz Terrorist


नवी दिल्ली :
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहनवाज उर्फ ​​शफी उज्जामा याला अटक केली आहे. यासोबतच त्याच्या चार साथीदारांनादेखील अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने शाहनवाजवर तीन लाख रुपयांचे बक्षीसही ठेवले होते.
 
दिल्ली येथील रहिवासी असलेला शाहनवाज व्यवसायाने इंजिनिअर आहे. तो पुणे इसिस प्रकरणात वॉन्टेड होता. पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर तो फरार झाला होता आणि दिल्लीत लपून बसला होता. एनआयएने या दहशतवाद्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीसही ठेवले होते.
 
त्यानंतर आता त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यासोबतच पोलिसांनी त्याच्याकडून काही आक्षेपार्ह वस्तूही जप्त केल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दक्षिण पूर्व दिल्लीतून त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्यासोबत आणखी चार जणांनासुद्धा अटक करण्यात आली आहे. शाहनवाज हा दिल्लीत मोठ्या हल्ल्याचा कट रचत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.




Powered By Sangraha 9.0