ITBP Recruitment 2023 : १० वी उत्तीर्णांना नोकरीची संधी!

02 Oct 2023 18:11:54
ITBP Recruitment 2023 Constable Post

मुंबई :
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी)अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून 'कॉन्स्टेबल' पदासाठी ही भरती केली जात आहे. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना आयटीबीपी अंतर्गत नोकरीची संधी मिळणार आहे.

आयटीबीपी अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑक्टोबर २०२३ असणार आहे. तसेच, या पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा बोर्डातून १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 


 
Powered By Sangraha 9.0