आयसीएमआर-क्षेत्रीय आयुर्विज्ञान अनुसंधान केंद्रात नोकरीची संधी

02 Oct 2023 17:06:32
ICMR Regional Medical Research Centre Recruitment

मुंबई
: आयसीएमआर-क्षेत्रीय आयुर्विज्ञान अनुसंधान केन्द्र अंतर्गत “तांत्रिक अधिकारी बी” पदांच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीकरिता उमेदवारास अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०२३ असणार आहे.

सदर भरतीकरिता उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून ३५ वर्षांपर्यंत असणार आहे. या भरतीकरिता उमेदवारास अर्ज हा संचालक, ICMR- रिजनल मेडिकल रिसर्च सेंटर, डॉलीगंज, पोर्ट ब्लेअर-७४४१०३ या पत्ता पाठवायचा आहे. तसेच, भरतीसंदर्भातील अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


 
Powered By Sangraha 9.0