GSL Recruitment 2023 : विविध रिक्त पदांची भरती, आजच अर्ज करा

02 Oct 2023 18:31:57
Goa Shipyard Limited Recruitment 2023

मुंबई : 'गोवा शिपयार्ड लिमिटेड'अंतर्गत रिक्त पदे भरण्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 'गोवा शिपयार्ड लिमिटेड'मधील विविध रिक्त पदांच्या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून अधिसूचनेनुसार एकूण ११ रिक्त जागांसाठी ही भरल्या जाणार आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 
या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरूवात झाली असून उमेदवारास अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०२३ असणार आहे. तसेच, गोवा शिपयार्ड लिमिटेड मधील मुख्य महाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

भरतीसंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
 
Powered By Sangraha 9.0