जयंत पाटील अजितदादा गटात जाणार!

19 Oct 2023 12:05:49
 
Jayant Patil
 
 
मुंबई : शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता. जयंत पाटीलांच्या दाव्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी गौप्यस्फोट केला आहे. जयंत पाटीलच आमच्या संपर्कात आहेत, असं मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी म्हटलं आहे.
 
माध्यमांशी संवाद साधताना धर्मरावबाबा अत्राम म्हणाले, "जयंत पाटील हे आमच्याकडे सुद्धा येऊ शकतात. ते आमच्या संपर्कात आहेत. त्यांचं आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांचं बोलणं सुरू आहे. आठ आमदारांसह ते आमच्या पक्षात सामील होतील. दर मंगळवारी आमच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांची बैठक होत असते. अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सगळे ४५ आमदार उपस्थित असतात. आमच्या गटाचे कोणी आमदार रडत आहे यात तथ्य नाही. महाराष्ट्र सरकारने अनेक कामांची स्थगिती सुद्धा उठवलेली आहे. मोठ्या प्रमाणात आम्हाला निधी मिळत आहे." असा दावा धर्मरावबाबा अत्राम यांनी केला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0