सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; केंद्र सरकारकडून वाढीव 'DA'ची भेट

18 Oct 2023 15:10:38
Union Cabinet Decision DA Hiked Announced

नवी दिल्ली :
ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदवार्ता दिली आहे. केंद्र शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या डीए म्हणजेच महागाई भत्त्यात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणखी ४ टक्क्यांची भर पडणार आहे.

दरम्यान, दिवाळीत सणासुदीच्या काळात केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना भेट देत असतं. त्यानुसार, त्यांना सणाच्या काळात महागाईचा सामना करण्यास मदत होईल. तसेच, या वाढीव महागाई भत्त्यासह केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्क्यांवर पोहोचला असून वाढलेला डीए १ जुलैपासून लागू होईल. त्याचबरोबर, याचा लाभ एक कोटींहून कर्मचाऱ्यांसह ६० लाखांहून अधिक पेन्शनधारकांनाही होणार आहे.


Powered By Sangraha 9.0