केंद्र सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर: जाणून घ्या यंदा किती मिळणार बोनस!

18 Oct 2023 16:14:35
Central Government Diwali Bonus Declared To Employees

नवी दिल्ली :
केंद्र सरकारकडून आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर ​सणासुदीच्या काळात केंद्र सरकारच्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट देत दिवाळी बोनस जाहीर केला.

दरम्यान, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिवाळीनिमित्त केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला असून याअंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना ३० दिवसांच्या पगाराएवढी रक्कम मिळेल तर बोनसचा लाभ केंद्रीय निमलष्करी दलातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांनाही मिळेल. या निर्णयामध्ये पॅरा मिलिटरी फोर्सच्या जवानांचाही समावेश केला जाईल, ज्यांना जास्तीत जास्त ७,००० रुपयांपर्यंत दिवाळी बोनस दिला जाईल.

तसेच, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बोनस अंतर्गत ग्रुप बी आणि ग्रुप सी श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ३० दिवसांच्या पगाराच्या बरोबरीने पैसे मिळतील. तर केंद्र सरकारने २०२२-२३ या वर्षासाठी गट-ब अराजपत्रित अधिकारी आणि गट-क कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला आहे.
Powered By Sangraha 9.0