मध्य प्रदेश निवडणूकीसाठी काँग्रेसचे वचनपत्र; रेवडी कल्चरच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न

17 Oct 2023 14:39:50
Congress 
 
भोपाळ : निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष सुद्धा सत्तेत येण्याची स्वप्न पाहत आहे. यासाठी काँग्रेसने मध्य प्रदेश निवडणूकीत मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी वचनपत्र देखील जाहीर केले आहे.
 
मध्य प्रदेशात 'काँग्रेस आएगी, समृद्धी लायेगी' असा नारा देत पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. काँग्रेसने आपल्या वचनपत्रात लोकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी अनेक गोष्टी मोफत देण्याच्या घोषणा केल्या आहेत. कर्नाटकमध्ये सुद्धा काँग्रेसने हेचं केले होते. त्यामुळे कर्नाटकमध्ये वापरलेला रेवडी कल्चरचा फॉर्मुला काँग्रेस बाकींच्या राज्यांमध्ये सुद्धा वापरण्याचा प्रयत्न करत आहे.
 
कर्नाटकमध्ये काँग्रेसने आपल्या वचनपत्रात काही हिंदूविरोधी घोषणा देखील केल्या होता. पण मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे नेते कमलनाथ सध्या सॉफ्ट हिंदुत्वाच्या लाईनवर चालताना दिसत आहेत. काँग्रेसने २ दिवसांपूर्वीच आपल्या १४४ उमेदवाराची यादी जाहीर केली. यामध्ये काँग्रेसने फक्त एका मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिली आहे.
 
त्यामुळे निवडणूका जिंकण्यासाठी काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. मागच्या काही दिवसांपासून कमलनाथ मोठ्या प्रमाणावर धार्मीक कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत. याआधी कमलनाथ हे तुष्टीकरणाच्या राजकारणसाठी ओळखले जात.
 
 
Powered By Sangraha 9.0