"भारतात आंदोलन करण्यापेक्षा 'ओवेसीं'नी गाजाला जाऊन लढाई लढावी"

17 Oct 2023 15:09:11
 asaduddin
 
मुंबई : हमासने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत दीड हजार निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. तरीही काही लोकं पॅलेस्टाईनच्या नावाखाली हमासला समर्थन देत आहेत. अशा लोकांना आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहे.
 
आसामचे मुख्यमंत्री म्हणाले की,"हमासच्या नावावर दहशतवादाचे समर्थन केले जात आहे. जे हमासला पाठिंबा देत आहेत, त्यांचा दहशतवादाला पाठिंबा देत आहे. भारत हा दहशतवादाचा सर्वात मोठा बळी ठरला आहे. सर्व लोकांनी दहशतवादाविरोधात आवाज उठवला पाहिजे."
 
वाराणसी दौऱ्यावर असलेल्या सरमा यांनी श्री काशी विश्वनाथ धाम येथे दर्शन पूजेनंतर झालेल्या संवादादरम्यान इंडी आघाडीवर आणि एमआयएमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, "इंडी आघाडी कायमच हिंदू विरोधी राहिलेली आहे. आणि मी ओवेसींना सांगतो की, इथे आंदोलन करण्यापेक्षा तुम्ही गाजामध्ये जाऊन लढाईत सहभाग घेतला पाहिजे."
 
याबरोबरच त्यांनी हमासच्या समर्थनार्थ रॅली काढणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली. मुख्यमंत्री म्हणाले की, "हमासच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणाऱ्यांना तुरुंगात पाठवले पाहिजे. जगात कुठेही दहशतवाद असेल तर भारत त्याविरोधात आवाज उठवेल. हमासचा निषेध करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. हमासच्या बाजूने बोलणारे भारताचे हितचिंतक नाहीत."
 
 
Powered By Sangraha 9.0