तथाकथीत फॅक्ट-चेकर मोहम्मद जुबेरवर अमेरिकन पत्रकाराचे गंभीर आरोप; म्हणाल्या,"तो मला..."

17 Oct 2023 18:54:53
Mohammed Zubair

मुंबई :
भारतातील तथाकथीत फॅक्ट चेकर पत्रकार मोहम्मद जुबेर यांच्यावर सतत हिंदू धर्मीयांविषयी द्वेष पसरवण्याचे आरोप केले जातात. आता असाच आरोप अमेरिकन शोध पत्रकार एमी मीक यांनी मोहम्मद जुबेरवर आणि त्यांच्या आल्ट न्यूज या वेबसाईटवर लावला आहे.

त्या आपल्या आरोपांमध्ये त्या म्हणाल्या की, " मोहम्मद जुबेरने नुपूर शर्मासोबत केले तसे आता तो मला लक्ष्य करत आहे, कारण मी हमाससारख्या इस्लामिक दहशतवादी संघटनांचा पर्दाफाश करत आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "मोहम्मद जुबेर नावाचा 'जिहादी' डाव्या विचारसरणीचे बनावट न्यूज पोर्टल चालवतो, जे मला आणि माझ्यासारख्या अनेक लोकांना लक्ष्य करत आहे."



त्याचबरोबर एमी मीक यांनी मोहम्मद जुबेरला काही प्रश्न पण विचारले. यामध्ये मुख्यत: आल्ट न्यूजच्या फंडीग विषयी आरोप करण्यात आले. मोहम्मद जुबेरला अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्या 'ओपन सोसायटी फाउंडेशन'कडून पैसे मिळतात का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.



एमी मीक यांनी यानीच नाहीतर इस्रायलचे मध्य-पश्चिम भारतातील महावाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी मोहम्मद जुबेरच्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) प्रोफाइलचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आणि लिहिले, "इस्रायलबद्दल खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवणे थांबवा. जर तुम्ही स्वतःला खरंच फॅक्ट चेकर म्हणता, तर इस्रायलला जा.”


Powered By Sangraha 9.0