ITI ते पदवीधरांना संधी; करन्सी नोट प्रेस, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू

17 Oct 2023 16:47:16
Currency Note Press Nashik Recruitment 2023

मुंबई :
करन्सी नोट प्रेस, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याभरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, आयटीआय ते पदवीधरांना या भरतीच्या माध्यमातून नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. १८ नोव्हेंबर २०२३ असणार आहे.

या भरतीद्वारे, करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांच्या ११७ जागा उपलब्ध झाल्या आहेत. याठिकाणी, पर्यवेक्षक (टी.ओ. प्रिंटिंग), पर्यवेक्षक (अधिकृत भाषा), कलाकार (ग्राफिक डिझायनर), सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ पदाच्या एकूण ११७ रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.

विविध पदांच्या भरतीसाठी पदांच्या आवश्यकतेनुसार वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तर पर्यवेक्षक (टी.ओ. प्रिंटिंग) – १८ – ३० वर्षे, पर्यवेक्षक (अधिकृत भाषा) – १८ – ३० वर्षे, कलाकार (ग्राफिक डिझायनर) – १८ – २८ वर्षे, सचिवालय सहाय्यक – १८ – २८ वर्षे, कनिष्ठ तंत्रज्ञ – १८ – २५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. करन्सी नोट प्रेस, नाशिक अंतर्गत होणाऱ्या भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Powered By Sangraha 9.0