कन्‍फर्मतिकिटचा आयसीसीसह सहयोग

17 Oct 2023 12:29:58
 
 
Confirmticketage
 
कन्‍फर्मतिकिटचा आयसीसीसह सहयोग

वर्ल्‍ड कप २०२३ सहयोगाचे ऑफिशियल लायसेन्‍स बनले
 
मुंबई:कन्‍फर्मतिकिट या भारतातील सर्वात गतीशील ट्रेन तिकिट बुकिंग व्‍यासपीठाला आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कप २०२३ साठी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) चे ऑफिशियल लायसेन्‍सी (अधिकृत परवानाधारक) बनल्‍याची घोषणा करताना अभिमान वाटत आहे.मीडिया एजन्‍सी वेव्‍हमेकर इंडियाने केलेला हा उत्‍साहवर्धक सहयोग कन्‍फर्मतिकिटला विश्‍वास निर्माण करण्यास आणि संपूर्ण भारतातील क्रिकेटची आवड असलेल्या प्रवाशांना एकत्र करण्यास साह्य करतो.
 
या सहयोगाला साजरे करण्‍यासाठी आणि क्रिकेटप्रेमींशी संलग्‍न होण्‍यासाठी कन्‍फर्मतिकिट इन-अॅप कॉन्‍टेस्‍ट्स आयोजित करेल,ज्‍या वर्ल्‍ड कपपर्यंतच्‍या प्रवासाला साजरे करण्‍यासोबत 'ऑफिशियल लायसेन्‍सी ऑफ द आयसीसी मेन्‍स किकेट वर्ल्‍ड कप २०२३' म्‍हणून व्‍यासपीठाच्‍या दर्जाला दाखवेल. हे प्रवास इन्‍स्‍टाग्राम, ट्विटर, लिंक्‍डइन व फेसबुक अशा विविध सोशल मीडियावर, तसेच त्‍यांचे प्रतिष्ठित भागीदार असलेल्‍या सोशल मीडिया चॅनेल्‍सवर साजरे व सादर केले जातील.
 
कन्‍फर्मतिकिटचे सह-संस्‍थापक दिनेश कुमार कोठा व श्रीपाद वैद्य या सहयोगाबाबत त्‍यांचा उत्‍साह व्‍यक्‍त करत म्‍हणाले, "भारतात क्रिकेट फक्‍त खेळ नाही तर आमच्‍या संस्‍कृतीचा महत्त्वपूर्ण भाग देखील आहे.आम्‍हाला आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कप २०२३चे ऑफिशियल लायसेन्‍सी असण्‍याचा आनंद होत आहे आणि आम्‍ही क्रिकेटप्रेमींसाठी संस्‍मरणीय अनुभव निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.हा सहयोग आम्‍हाला भारतीयांच्‍या वर्ल्‍ड कपप्रती उत्‍साहाला साजरे करण्‍याची आणि क्रिककेटप्रेमींना त्‍यांच्‍या क्रिकेटिंग लीजेण्‍ड्सच्‍या समीप आणण्‍याची संधी देतो.आम्‍ही भारतभरातील क्रिकेटप्रेमींसोबत वर्ल्‍ड कपचा प्रवास शेअर करण्‍यास उत्‍सुक आहोत."
 
या सर्वसमावेशक उपक्रमांचा भाग म्‍हणून कन्‍फर्मतिकिटने किकेटप्रेमी आणि त्‍यांच्‍या व्‍यापक युजरवर्गाशी संलग्‍न होण्‍याकरिता उत्‍साहवर्धक मोहिम 'जर्नी टू द वर्ल्‍ड कप' देखील लाँच केली आहे. या मोहिमेअंतर्गत कन्‍फर्मतिकिट दोन खास कॉन्‍टेस्‍ट्सचे आयोजन करणार आहे,ज्‍यामधून विजेत्‍यांना वर्ल्‍ड कपसाठी सर्वात उत्‍साहवर्धक ट्रेन प्रवासाबाबत जाणून घेण्‍यासाठी जॉर्डइंडियन, दानिश सैत,भारत आर्मी यांसारख्‍या लोकप्रिय प्रभावकांशी संलग्‍न होण्‍याची संधी मिळेल.ट्रेन युअर क्रिकब्रेन कॉन्‍टेस्‍ट निस्‍सीम क्रिकेटप्रेमींना ट्रेन बुकिंग अॅप कन्‍फर्मतिकिटवरील त्‍यांच्‍या माहितीची चाचणी घेण्‍याची संधी देते.
 
Powered By Sangraha 9.0