नगर-आष्टी रेल्वेला भीषण आग!

16 Oct 2023 17:57:02

railway fire

अहमदनगर :
नगर-आष्टी रेल्वेच्या डब्याला शिराडोह परिसरात दुपारी तीनच्या दरम्यान भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला पहिल्या दोन डब्यांना लागली होती. परंतू आगीचे लोट एवढे होते की, ही आग पुढे पाच डब्यांपर्यंत पोहोचली. सुदैवाने गाडीत गर्दी नसल्याने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसून रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.

स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न तात्काळ सुरु करण्यात आले होते त्यामुळे चार वाजताच्या सुमारास आग विझवण्यात यश आले आहे. तरी, ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही. आग लागल्याच्या घटनेनंतर पोलीस आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षभरापूर्वीच अहमदनगर-आष्टी ही रेल्वे सेवा सुरु करण्यात आली होती.

Powered By Sangraha 9.0