भारतावर ‘एल-निनो’चे सावट; पुढील वर्षी दुष्काळ?

16 Oct 2023 15:35:30
el nino

नवी दिल्ली :
यंदाच्या पावसाळ्यात जेमतेम सरासरी गाठणारा पाऊस पुढील वर्षी फारच कमी होणार असून, देशात अन्नधान्यासह पाण्याचे संकट भेडसावण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या हवामान विषयक संस्थेने पुढील वर्षी ‘एल निनो’ची तीव्रता अधिक असणार असल्याचा संकेत दिला आहे. त्याचा थेट परिणाम भारताच्या पर्जन्यमानावर होणार आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रीय सागरी आणि हवामानविषयक अंदाज वर्तविणार्‍या केंद्राने दिलेल्या माहितीनुसार उत्तर गोलार्धात मार्च ते मे २०२४ या कालावधीत ‘एल निनो’चा प्रभाव अधिक असणार आहे. भूतकाळातील प्रभाव पाहता १९९७-९८ आणि २०१५-१६ प्रमाणे पर्जन्यमानावर त्याचा थेट परिणाम होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0