सचिनने घेतली शोएब अख्तरची शाळा; म्हणाला, सर्व काही....

15 Oct 2023 16:18:56
Sachin Tendulkar And Shoaib Akhtar Twitter War

मुंबई :
विश्वचषक २०२३ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना काल अहमदाबाद येथे खेळविण्यात आला. यासामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून विजय मिळविला. यासामन्यानंतर, माजी क्रिकेटपटूंमध्ये ट्विटर वॉर पाहायला मिळाले. भारताच्या विजयानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने पाकच्या माजी क्रिकेटपटूंची शाळा घेतली.


पाकचा माजी गोलंदाज शोएब अख्तरला उत्तर देत सचिनने म्हटले की, सर्व काही अतिशय थंड ठेवण्यात आले होते, असे म्हणत त्याने पाकची खिल्ली उडविली. तर इस्रायल म्हणाला की, पाकिस्तान हा विजय हमासच्या दहशतवाद्यांना समर्पित करू शकत नाही. तसेच, "आम्ही आनंदी आहोत की CWC 2023 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारत विजयी झाला आणि पाकिस्तान आपला विजय हमास दहशतवाद्यांना समर्पित करू शकला नाही."


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या विजयावर एक पोस्ट केली. पीएम मोदींनी लिहिले, “टीम इंडियाने अष्टपैलू उत्कृष्टतेच्या जोरावर अहमदाबादमध्ये मोठा विजय मिळविला. टीम इंडियाचे अभिनंदन आणि आगामी सामन्यांसाठी शुभेच्छा.
Powered By Sangraha 9.0