'एमपीएससी'अंतर्गत मेगाभरती! एकूण ७,५१० जागांसाठी अर्जप्रक्रिया सुरू होणार

15 Oct 2023 17:22:36
 Maharashtra Public Service Commission Recruitment

मुंबई :
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात (एमपीएससी)अंतर्गत मेगाभरती केली जाणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र गट -क सेवा मुख्य परीक्षा २०२३ द्वारे एकूण ७,५१० पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

एमपीएससी अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या माध्यमातून उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक ही रिक्त पदे भरली जाणार आहे. या पदांच्या भरतीसाठी दि. १७ ऑक्टोबर २०२३ पासून अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच, उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. ३१ ऑक्टोबर २०२३ असणार आहे.

या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्जशुल्क आकारले जाणार आहे. अमागासवर्गीयांसाठी ५४४ रुपये तर मागासवर्गीयांसाठी ३४४ शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच, शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.  

Powered By Sangraha 9.0