आठवडी बाजार म्हणजे महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ : मंत्री मंगलप्रभात लोढा

15 Oct 2023 19:57:28
Cabinet Minister Mangal Prabhat Lodha

मुंबई :
महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी 'आठवडी बाजार' महत्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. दरम्यान, महापालिकेने आठवडी बाजारांचा अत्यंत चांगला उपक्रम सुरू केला असे सांगतानाच महिला बचतगट खूप चांगल्या प्रकारे कार्यरत असून त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे मंत्री लोढा यावेळी म्हणाले.

तसेच, राज्य शासन व केंद्र सरकारच्या योजनांचाही लाभ या बचतगटांना मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही लोढा म्हणाले. या कार्यक्रमाला नगरसेवक पंकज यादव, अभिजित सामंत, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, एशिया पॅसिफिक लीड पब्लिक सेक्टर इनोवेशनच्या (यूएनडीपी) आफ्रिन सिद्दीकी, पब्लिक डिप्लोमसी ऑफिसर (वाणिज्य दूत कार्यालय, अमेरिका ) सीटा रैटा उपस्थित होते.


Powered By Sangraha 9.0