'ऑपरेशन अजय'ची यशस्वी वाटचाल! ९१८ भारतीय मायदेशी परतले
15 Oct 2023 17:41:14
मुंबई : ७ ऑक्टोबर रोजी सुरु झालेले इस्त्रायल आणि हमासमधील युद्ध अद्याप सुरुच आहे. यामध्ये इस्त्रायलमधील अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच इस्त्रायलमध्ये वास्तव्यास असलेल्या अनेक देशांतील लोकांचा बळी गेला आहेत.
इस्रायलमध्ये असलेल्या नागरिकांना आपल्या मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडून एक विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. इस्त्रायलमधील भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ राबवले जात आहे. याद्वारे आतापर्यंत ९०० हून अधिक लोकांना भारतात आणण्यात यश आले आहे.
इस्त्रायलमधून आतापर्यंच चार विमाने आली असून चौथ्या विमानातून जवळपास २७४ लोक भारतात परतले आहेत. दरम्यान, इस्त्रायलमध्ये एकूण १८,००० भारतीय वास्तव्यास असून यातील बरेच जण आपल्या मायदेशी परतण्यास इच्छुक आहे.
तसेच अनेक लोकांनी या कठीण काळात इस्त्रायलची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत भारतीय हवाई दलाकडून इस्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष उड्डाणे चालवले जात आहेत. या ऑपरेशनद्वारे भारत सरकारने आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे भारतात आणण्याचा निर्धार केला आहे.