विश्वचषक २०२३ : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची विक्रमी तिकीटविक्री

14 Oct 2023 15:39:16
india vs pakistan match world cup 2023 at ahmedabad

मुंबई :
आयसीसी विश्वचषक २०२३ मधील महामुकाबला भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबाद येथे सुरू आहे. भारत या सामन्यात जिंकण्याची शक्यता जास्त वर्तविली जात आहे. भारताने होम ग्राऊंडवर खेळताना विश्चचषकातील एकही सामना गमावलेला नाही. यंदाच्या भारत आणि पाक सामन्यात तिकीटविक्री सुरु झाल्याबरोबर भारतीय क्रिकेटरसिकांनी विशेषकरून या सामन्याला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. या सामन्याची विक्रमी तिकीटविक्री झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येत असून आतापर्यंत एक लाखांहून अधिक तिकीटे विकली गेल्याचे समजते आहे. भारतातील सर्वाधिक आसनक्षमता असलेले एकमेव स्टेडियम म्हणून गणना केली जाते. या स्टेडियमवर १ लाखांहून अधिक प्रेक्षक बसू शकतात. तसेच, हा सामना म्हटलं की, हायव्होल्टेज गेम असतो. भारताने आजवर पाकिस्तानला विश्चचषक सामन्यात धूळ चारली आहे. त्याचबरोबर, बीसीसीआयदेखील या सामन्याचे नियोजन अगदी सुट्टीच्या दिवशी केल्याचे पाहायला मिळते.
Powered By Sangraha 9.0