मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची आशा पुन्हा पल्लवित!

14 Oct 2023 11:11:42

Maratha Reservation


मुंबई :
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची आशा पुन्हा पल्लवित झाली आहे.
 
राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती. राज्य सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील ज्येष्ठ विधिज्ञ मनिंदर सिंह यांनी ही क्युरेटिव्ह याचिका दाखल करून त्यावर सुनावणी करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.
 
आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी राज्य शासनाने दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास होकार दिला आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे पहिले यश आहे.



Powered By Sangraha 9.0