भारतीय गोलंदाजांपुढे 'बाबरची सेना' नेस्तनाबूत

14 Oct 2023 17:20:41

Pakistan Cricket Team All Out

मुंबई :
भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यात अहमदाबाद येथे विश्वचषकाचा सामना सुरू आहे. भारताने प्रथम गोलंदाजी करत पाकला बॅटिंगचे आमंत्रण दिले. भारताने पाकच्या संघाला २०० धावांच्या आतच रोखले. पाक संघाला फक्त  १९१ केल्या. भारताला विजयासाठी फक्त १९२ धावांची आवश्यकता आहे. पाकने प्रथम फलंदाजी करत धावा केल्या. मोहम्मद सिराज, बुमराह, पंड्या, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.रविंद्र जडेजाने ३ विकेट्स घेतल्या. 

पाकिस्तानाचा कप्तान बाबर आझम ५० धावा करून बाद होताच उर्वरित संघास गळती लागली. पाक ७ बाद १८१ धावा अशा स्थितीत असून बाबर आझम पाठोपाठ जेमतेम सहा षटकांत पाकिस्तानचा निम्मा संघ माघारी परतला. भारताच्या गोलंदाजीसमोर पाकच्या संघाने मान टाकली असून भारताचा फिरकीपटू चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेत पाकला बॅकफूटवर ढकलले. त्याने सौद शकील, इफ्तिखार अहमद यांना स्वस्तात माघारी धाडले. सौद शकील आणि इफ्तिखार अहमद या दोघांनाही त्रिफळाचित करण्यात यादव यशस्वी झाला. कप्तान बाबर आझम आऊट होताच पाकचा अर्धा संघ ढेपाळला.

दरम्यान, या दोघांनाही दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. याआधी पाकला मोठा धक्का बसला असून पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम फक्त ५० धावा करून बाद झाला. मोहम्मद सिराजने बाबरला क्लिन बोल्ड केले. त्याने ७ चौकारांसह ५८ चेंडूत ५० धावा केल्या. भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यात अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकने प्रथम फलंदाजी करताना अब्दुल्लाह शफिक, इमाम-उल-हक हे दोघे स्वस्तात माघारी परतले. शफिकने २४ चेंडूत २० धावा केल्या तर इमामने ३८ चेंडूत ३६ धावा केल्या.

भारताने गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी स्पेलची सुरुवात केली. ८ व्या षटकात सिराजने शफिकची विकेट घेत पाकला पहिला धक्का दिला. ऑल राऊंडर हार्दिक पांड्याने इमामची विकेट घेत दुसरा धक्का दिला. दरम्यान, भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेटरसिकांसाठी मेजवानी असते.
Powered By Sangraha 9.0