"भुजबळ आमचे दैवत, भानगडीत पडू नका नाहीतर..."

14 Oct 2023 17:47:58

Mahadev Jankar 
 
 
मुंबई : मंत्री छगन भुजबळ आमचे दैवत असुन त्यांना धमकी देणं हे चूक आहे. असं काही होत असल्यास बाकीचा समाज गप्प बसणार नाही. असा इशारा रासपचे महादेव जानकर यांनी दिला आहे. नाशिक दौऱ्यावर असताना जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
 
महादेव जानकर म्हणाले, "छगन भुजबळ आमचे दैवत असून अशा प्रकारे धमकी देणं चूक आहे. बाकीचा समाज गप्प बसणार नाही. अशा धमकी देऊ नका, हे योग्य नाही, तसेच या भानगडीत पडू नका नाहीतर आम्हाला विचार करावा लागेल. राष्ट्रीय समाज पक्षाकडून मागील अडीच महिन्यापासून जनस्वराज्य दौरा सुरू आहे. अनेक राज्यात आम्ही गेलो, जाणार आहे. जनतेचे राज्य आले पाहिजे, सगळे पक्ष साथ देत आहे, जनस्वराज्य यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे." असं जानकर म्हणाले.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0