शनिशिंगणापूरमध्ये भाविकांची मांदियाळी! पहाटेपासूनच लागली दर्शनाची रांग

14 Oct 2023 13:05:10

Shani Shingnapur


मुंबई :
शनिवारी सर्वपित्री अमावस्या असल्यामुळे अहमदनगरमधील श्री क्षेत्र शनिशींगणापुरमध्ये भाविकांची गर्दी जमली आहे. देशभरातून जवळपास ७ लाख भाविक शनिशिंगणापूरमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर या गावात शनि देवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
 
दरवर्षी देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. यावर्षीही सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने भाविक येथे दर्शनासाठी जमले आहेत. विशेष म्हणजे शनिवारी ही अमावस्या असल्यामुळे येथे भाविकांची गर्दी जमली आहे. रात्री १२ वाजतापासूनच ही गर्दी जमली आहे. तसेच पहाटेपासून भाविकांची दर्शनाची रांग लागलेली आहे. याप्रसंगी शनिशिंगणापूर देवस्थानकडून भाविकांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.





Powered By Sangraha 9.0