42 कोटींची कॅश असलेले 23 खोके पाहून आयकर अधिकारीही चक्रावले: काँग्रेसच्या नेत्याच्या घरात सापडलं घबाड

13 Oct 2023 14:16:41
 INCOME TAX
 
बंगलोर : आयकर विभागाने करचुकवेगिरीच्या संशयावरून बंगलोरमधील काँग्रेसच्या माजी नगरसेवीकेच्या घरी छापे टाकले होते. बेंगळुरूमध्ये गुरुवारी मध्यरात्री आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात एका फ्लॅटमधून ४२ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना बेंगळुरूमधील एका फ्लॅटमध्ये पलंगाखाली करोडो रुपयांची रोकड सापडली, अशी माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली.
 
याप्रकरणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी माजी महिला नगरसेवीका आणि त्यांच्या पतीची चौकशी करत आहेत. पाच राज्यांमध्ये विशेषत: राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीसाठी निधी देण्यासाठी बंगलोरमधील सोन्याचे दागिने विक्रेते आणि इतर स्रोतांकडून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात माहिती मिळताच आयकर विभाग शहरात छापे टाकत आहे. आरटी नगरजवळील आत्मानंद कॉलनीतील फ्लॅटमध्ये गुरुवारी रात्री उशिरा टाकलेल्या छाप्यात ४२ कोटी रुपयांची रोकड सापडली.
 
पलंगाखाली २३ बॉक्समध्ये ४२ कोटी रुपयांच्या ५०० रुपयांच्या नोटा ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. नगरसेवीकेचे पती कंत्राटदार आहेत. त्यासोबतच ते कंत्राटदार युनियनचे अध्यक्ष आहेत. यांनीच कर्नाटकमध्ये भाजप सरकार असताना त्यांच्यावर ४० टक्के कमीशन घेत असल्याचा आरोप केला होता. आता त्यांच्याच घरी ४२ कोटींची रोकड मिळाली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0