फक्त ९९ रुपयांत पहा कुठलाही चित्रपट

12 Oct 2023 16:04:03

picture

मुंबई :
मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्ताने मोठी घोषणा केली आहे. सामान्यतः २०० ते ३५० च्या दरम्यान असलेली तिकिटे या दिवशी मल्टिप्लेक्समध्ये केवळ ९९ रुपयांत मिळणार आहेत. तिकीटे प्रेक्षकांना, बूक माय शो किंवा पेटीएमवरुन बूक करता येणार आहेत.
 
राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या विशेष प्रसंगी सर्व वयोगटातील प्रेक्षकांना सिनेमाच्या निमित्ताने एकत्र वेळ घालवता येतो, असा या योजनेमागील उद्देश आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने गतवर्षीसुद्धा हि योजना आखली होती. त्यावेळी ६.५ दशलक्ष प्रेक्षकांनी या योजनेचा लाभ घेऊन उत्कृष्ट यश मिळवले होते.
 
यावर्षीसुद्धा राष्ट्रीय सिनेमा दिनचे औचित्य साधून ४००० हून अधिक स्क्रीनवर कमी दरात चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यात पीव्हीआर आयनॉक्स, सिनेपोलिस, मिराज, सिटीप्राइड, एशिया, मुक्ता ए2, मूव्ही टाइम, एम2के, डिलाइट आणि इतर प्रसिद्ध चित्रपटगृहांचा समावेश आहे. ही योजना तामिळनाडू, तेलंगना व आंध्रप्रदेशात नाही.

Powered By Sangraha 9.0