भारताचा विश्वचषकात सलग दुसरा विजय

12 Oct 2023 14:53:10
worldcup

नवी दिल्ली : एकदिवसीय विश्वचषक-२०२३ मध्ये भारताने अफगाणिस्तानला हरवून या स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयासह भारताचे चार गुण झाले असून गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले. राजधानी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर बुधवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने आठ गड्यांच्या मोबदल्यात २७३ धावा केल्या.

भारताने हे लक्ष्य अवघ्या ३५ षटकांत पूर्ण केले. भारताकडून सलामीला आलेल्या कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीच्या षटकांमध्येच आक्रमक खेळी केली. त्याने ३० चेंडूत अर्धशतक आणि ६३ चेंडूत शतक झळकावले. ८४ चेंडूत १३१ धावा करून तो बाद झाला. या खेळीत त्याने १६ चौकार आणि पाच षटकार ठोकले. गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात चार बळी घेतले.
Powered By Sangraha 9.0