खारीगाव टोलनाक्यावर एफडीएने जप्त केला लाखोंचा पानमसाला

12 Oct 2023 19:44:12
FDA seized panmasala worth lakhs

ठाणे :
कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खारीगाव टोलनाक्यावर एका टेम्पोमध्ये सुमारे साडेचोवीस लाखांचा सुगंधी पानमसाला व जाफरानी जर्दा वाहतूक होत असल्याची माहिती कळवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार,अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि कळवा पोलिसांनी तपासणी करून मुद्देमालासह टेम्पो ताब्यात घेऊन चालकाला अटक केली.

ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध गुटखा, सुगंधी पानमसालाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी एफडीए सतर्क असते. कळवा पोलीस आणि एफडीएला मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास ठाण्यातील खारेगाव टोलनाका,येथे आरोपी मंजितकुमार गांगो राय, (२७) व्यवसाय-चालक रा.चुनाभट्टी, काशिमिरा हा अशोक लेलंन्ड टेम्पो या वाहनामधुन लाखोंचा प्रीमीयम राज निवास सुंगधीत पानमसाला व प्रीमियम झेड एल १ जाफरानी जर्दा हे प्रतिबंधित अन्नपदार्थ वाहतुक करताना आढळला.
Powered By Sangraha 9.0