मुंबई : खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणावर भाष्य केले. यावेळी बोलताना राऊतांनी सरकारवर टीका केली. यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे आणि एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे.
खा. संजय राऊतांना उद्देशून बोलताना नितेश राणे म्हणाले की, "उडता महाराष्ट्राचा प्रमुख तुझ्या मालकाचा मुलगा मातोश्रीत राहतो. मविआ काळात तुझा मुलगा किती वेळ शुद्धीत असायचा? तो रिझवी कॉलेज भागात कुणाला भेटायचा? सुशांत दिशा प्रकरणात कुणकुणाची नावे येणार होती ? त्या काळात जुन्या महापौर बंगल्यावर किती ड्रॅग पेडलर यायचे ते आम्ही सिद्ध करू शकतो. मविआ सरकारमधील त्या मंत्र्याचे ड्रग्ज पेडलरसोबत संबंध असून त्याची चौकशी करण्याची मागणी आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत." अशी टीका राणेंनी नाव न घेत उबाठा गटावर केली आहे.