महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनीत भरती सुरू, आजच अर्ज करा

11 Oct 2023 11:24:36
Maharashtra State Electricity Board Transmission Company Recruitment

मुंबई :
महाराष्ट्र शासनाची विद्युत मंडळांपैकी एक असलेली 'महाट्रान्स्को'अंतर्गत भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. महाट्रान्स्को मधील विविध रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र स्टेट ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (MSETCL) ने एक जाहिरात प्रसिध्द केली आहे.
 
या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र स्टेट ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड मधील कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उप कार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण) आणि सहाय्यक अभियंता (दूरसंचार) ही रिक्त पदे भरली जाणार आहेत.
 
सदर भरतीकरिता उमेदवारास अर्ज हा अंतिम मुदतीआधी करणे बंधनकारक असेल. उमेदवारासाठी दि. २४ ऑक्टोबर २०२३ अंतिम मुदत असणार आहे. भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Maharashtra State Electricity Board Transmission Company Recruitment

Powered By Sangraha 9.0