ठाणे : आपण ‘लव्ह जिहाद’ आणि ‘ड्रग्ज जिहाद’मुळे बरबाद होण्यासाठी जन्मलो नाही, तर स्वतः सोबत आपले कुटुंव, समाज आणि देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी जन्मलो असा घणाघात दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी केला. ठाणे शहर भाजपतर्फे सांज-संध्या सभागृहात मुलींसाठी स्व संरक्षण शिबिराचे आयोजन रविवार, दि. १ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. त्यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यात प्रमुख वक्ता म्हणून योगिता साळवी बोलत होत्या.
या कार्यक्रमासाठी भाजप युवा नेत्या वृषाली वाघुले आणि ठाणे भाजप महिला मोर्चा अध्यक्ष मा. नगरसेविका स्नेहा पाटील यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाला भाजपचे ठाणे अध्यक्ष संजय वाघुले प्रमुख अतिथी मार्गदर्शक लाभले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्नेहा पाटील यांनी प्रास्ताविक केले. आपल्या व्याख्यानात योगिता साळवी यांनी कुटुंब, संस्कार, समाज आणि धर्म यांचे आपल्या जीवनातील महत्त्व, धर्म संस्कृती संवर्धनामुळे ‘लव्ह जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’पासून कसे वाचू याबद्दल विश्लेषण केले. प्रलोभण आकर्षण प्रेम, सत्य आणि वास्तव याचा विचार करून आपण सतर्क राहायला हवे.
संस्कार संस्कृती हा अभाव कौटुंबिक नातेसंबंधनामधले दुरावलेपण यामुळे ‘त्या’ ‘लव्ह जिहाद’च्या बळी ठरतात, असे त्या म्हणाल्या. ‘लव्ह जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’ म्हणजे काय हे सांगून त्यांनी ‘लव्ह जिहाद’च्या सत्य घटना सांगितल्या. उज्ज्वल भवितव्यासाठी मुलींनी सावध राहायला हवे, संस्कार, संस्कृती जपली पाहिजे. कायदा तुमच्यासोबत आहे समाज तुमच्यासोबत आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी पूर्वा मॅथ्यू -लोकरे यांनी स्व संरक्षणची प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, सरचिटणीस समिरा भारती, मनोहर सुखदरे राकेश जैन स्थानिक नगरसेविका कमल चौधरी, कविता पाटील नंदा पाटील माजी नगरसेवक मुकेश मोकाशी, युवा मोर्चा अध्यक्ष सुरज दळवी, मंडळ अध्यक्ष अॅड. हेमंत म्हात्रे कापूरबावडी पोलीस स्टेशन माजी पोलीस निरीक्षक भारावकर, प्रतिभा मोकाशी, रितू शिखोन. महिला मंडळ मोर्चा अध्यक्ष सपना भगत यांच्यासह भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.